आगामी सण – उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरे करा – जिल्हाधिकारी (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम आणि दहीहंडी या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे, आमदार राजूमामा भोळे, महापालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, यांच्यासह सर्व तालुक्यातील विभागीय अधिकारी,  उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, “गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम, तसेच अन्य आगामी सण-उत्सव शांततेत, उत्साहात आणि जल्लोषात पार पडावे यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, तसेच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत देण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना तालुका प्रशासनाला दिले आहे. सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच समाजप्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे.” गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम या सणाच्या काळात राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने गणेश मंडळांनी नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ लिंक :

 

Protected Content