मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईतील ज्येष्ठ नेते संजय निरूपम यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पण त्यांनी अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी भाषणामुळे पक्षाने ही कारवाई केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजून खरगे यांनी त्यांची हकालपट्टी करण्यात मान्यता दिली आहे. हकालपट्टीच्या कारवाईपूर्वी संजय निरुपम यांनी एक्सवर ट्विट करून काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. आपण आधीच पक्षाचा राजीनामा दिला असल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संजय निरूपम नाराज होते. शिवसेना ठाकरे गटाने मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे संजय निरूपम प्रचंड संतापले होते. ते या जागेच्या उमेदवारीसाठी इच्छूक होते. पण आता आपल्याच पक्षातून हकालपट्टी झाल्यावर निरूपम पुढे कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे राहील.