जळगाव प्रतिनिधी । आजच्या महापालिकेच्या महासभेत अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर झाले आहेत. तथापि राजकीय दावे – प्रतिदावे करण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार भाजप सदस्यांनी गोंधळ घातला आणि नंतर बहुमताने ठराव मंजूर झाले, असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महासभेनंतर सांगितले.
महासभेनंतर लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना उपमहापौर कुलभूषण पाटील पुढे म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. महापौरांनी भाजप सदस्यांना त्यांचे मत मांडण्याची परवानगी दिली होती. वॉटरग्रेस आणि महापालिका यांच्यातील करारनाम्यात लवादाची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आणि गाळेधारक दुकानदारांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यावेळी गोंधळ झाला भाजपचे काही सदस्य तटस्थ होते. काही व्यापाऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत, असे म्हणत होते तर काहींचा विरोध होता. नंतर मात्र एकमत झाल्यावर त्यांनी गाळेधारकांच्या मागण्यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असाच आधी मतभेद आणि नंतर मान्यतेचा प्रकार वॉटरग्रेस आणि महापालिका यांच्यातील करारनाम्यात लवादाची नेमणूक करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यावेळीही झाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहरासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता मात्र काही कारणांमुळे या निधीतून केली जाणारी कामे थांबलेली होती आज या मुद्यावरही चर्चा होऊन या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.