पाळधी येथील दंगलीचा कुलजमाती कौन्सिलतर्फे तीव्र निषेध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी येथे  २८ मार्च रोजी दिंडीवर झालेल्या दगडफेकीचा तीव्र शब्दात निषेध करून समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई केल्याबाबत पोलिसांचा अभिनंदनासह पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना मागण्यांचे निवेदन कुलजमाती कौन्सिलतर्फे गुरूवारी ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता देण्यात आले.

 

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी गावात मंगळवारी 28 मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पायी जाणाऱ्या दिंडीवर गावातील काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. याचे रूपांतर दंगलीत झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्यासह पथक वेळेत घटनांसाठी दाखल झाले होते. पोलिसांनी या दंगलीतील दोन्ही गटातील काही जणांना अटक देखील करण्यात आली.

 

दरम्यान, कुल जमाती कौन्सिलच्या शिष्टमंडळाने गुरुवार ३० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात म्हटले आहे की, दंगलीत जे निरपराध तरुणांना अटक झालेली आहे, त्याची पडताळणी करून त्यांची त्वरित सुटका करणे, दगडफेकमध्ये तोडफोड, लूटमार व आग लावल्याबद्दल ११ दुकानदारांना व वाहन मालकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणे , रमजान पर्व व हिंदू धर्मियांचे उत्सव सुरू असल्याने पाळधी गावातील काही पुरुषवर्ग हा घराबाहेर निघून गेला असल्याने पोलीस दलामार्फत विश्वास देऊन त्यांना आपापल्या घरी येण्याचे आवाहन करण्यात यावे, जेणेकरून गावात शांतता निर्माण होण्यास मदत होईल, एफआयआरमध्ये अशी काही नावे आहेत की घटना घडली त्यावेळी हे तरुण दुसरीकडे आपली प्रार्थना करीत होते व तसे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने त्यांच्या बाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा सात बाबींवर चर्चा करण्यात आली.

 

 

याप्रसंगी सय्यद चांद , डॉ. जावेद , शहर काजी मुफ्ती अतिकुर रहमान, मुफ्ती हारून नदवी, फारुख शेख, सोहेल आमिर, करीम सालार, महमूद खान, आरिफ देशमुख, मजहर खान, नगरसेवक रियाझ बागवान, अतिक अहमद, अनिस शहा, अन्वर खान, शकील हंनान, बशीर बुऱ्हानी, हाफिज रहीम, शेख नईम बशीर आदींची उपस्थिती होती.

Protected Content