बालाजी मंदीरात दानपेटी चोरट्यांनी लांबविली

पारोळा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पारोळा तालुक्यातील बहाळपूर येथील बालाजी मंदिरातील दानपेटीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील बहाळपूर येथे श्री बालाजी महाराज यांचे मंदिर आहे. २९ मार्च रोजी रात्री ९ ते ३० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरात असलेली दानपेटी चोरून नेली. सकाळी ६.३० वाजता शेतकरी सुभाष नामदेव पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतु काहीही माहिती मिळाली नाही. दरम्यान सुभाष पाटील यांनी पाराळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण पारधी करीत आहे.

Protected Content