आरबीआयची व्याजदरात कपात; कर्ज होणार कमी

मुंबई वृत्तसंस्था । देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली आहे. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे.

बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या पतधोरण समितीने नियोजित वेळापत्रकाचा आठवडाभर आधीच बैठकी घेतली. ज्यात समितीने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. आरबीआयने रेपो रेट ०.७५ टक्के घटवून ४.४० टक्के केला आहे. रिव्हर्स रेपो रेट ०.९० टक्के घटवून ४ टक्के केला असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

Protected Content