Member Registration : युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील युवासेनेतर्फे इंद्रप्रस्थ नगर येथे रविवार दि. २४ एप्रिल रोजी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. यावेळी सदस्य नोंदणी करण्यासाठी युवकांनी मोठया प्रमाणात उत्साह दाखवला.

पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने व युवासेना सचिव दुर्गाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान २०२२ वीर सावरकर सभागृह, इंद्रप्रस्थ नगर येथे रविवार, दि.२४ रोजी शिवसैनिक महेश ईश्वर ठाकूर यांच्या पुढाकाराने  आयोजित झाला होता.  या कार्यक्रमाचे उद्घाटन व युवासेना सदस्य कार्ड वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभासद नोंदणी करण्यासाठी युवकांनी उत्साह दाखवला. तरुणांना आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगणे युवासेना शिकवते. विविध समाजकार्य करण्यासाठी युवासेना अग्रेसर आहे. युवकांनी युवासेनेत सहभागी व्हावे असेही यावेळी  शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी युवा सेना उप जिल्हा अधिकारी पियुष गांधी, महानगर समन्वयक निलेश सपकाळे, उप महानगर अधिकारी जय मेहता, विभाग अधिकारी अमोल मोरे, शिवसैनिक ऍड अभिजित रंधे, शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज पोकळे, पृथ्वी देशमुख, लोकेश चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारंग चौधरी, राकेश थोरात, राहुल नागला, केतन जाधव, हर्षल तुळसकर, प्रशांत नेरकर, गौरव ठाकूर, रोशन पाटील, केतन पाटील, शाम जाधव, ललित चौधरी यांच्यासह लोकमान्य युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content