Kidnapping : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.

शनिवार, दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील ऋषीकेश सुरेश पावले याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोपी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ऋषीकेश पावले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण हे करीत आहे.

Protected Content