वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दादावाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई करत पकडले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरातून मध्यरात्री डंपरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याच प्रभारी अधिकारी परिविक्षाधिन पोलीस  उपअधिक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोलीसांनी गुरूवार २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास कारवाई करत वाळूने भरलेला डंपर थांबविला. त्यानंतर वाळू वाहतूकीबाबत परवाना असल्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर पोलीसांनी वाळूने भरलेला डंपर जळगाव तालुका पोलीसात जमा केला. पोहेकॉ हिरालाल गुमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक अजय ज्ञानेश्वर सपकाळे (वय-२६) रा. खेडी ताजि.जळगाव याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश ठाकूर करीत आहे.

Protected Content