घरातून रोकड लांबविणाऱ्या संशयित आरोपीला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा येथे घरफोडी केल्याप्रकरणी शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता एमआयडीसी पोलिसांनी इश्तीयाक अली राजीक अली (२०, रा. तांबापूरा) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तांबापूरा येथील सादीन शब्बीर पटेल यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरूवारी २फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्र फिरविल्यानंतर घरफोडी करणारा हा तांबापूरा येथील इश्तीयाक अली राजीक अली रा.तंबापुरा, जळगाव हा असल्याची समोर आली. अखेर शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता संशयित आरोपीला तांबापूरा येथून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील यांनी केली आहे. त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, इश्तीयाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ६ घरफोडीचे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Protected Content