प्रतिबंधित ७४ हजार १४९ रुपयांचा गुटखा जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी|। शहरातील शाहू नगरात विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित ७४ हजार १४९ रुपयांचा गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाल्याची घटना शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता केली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ किशोर निकुंभ व पोकॉ तेजस मराठे हे शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सुमारास पेट्रोलिंग करत असताना शाहूनगर परिसरात अयान हसन भिस्ती (वय-२०, रा. शाहूनगर) हा नशेत असल्याचे आढळून आले. मात्र मद्याचा वास येत नव्हता. त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले असता त्याने एमडी ड्रग्जची नशा केली असून घरात एमडी ड्रग्ज ठेवले असल्याचे सांगितले. त्याच्या घरी कारवाईसाठी पोलिस पथक रवाना झाले. तेथे गेल्यानंतर त्याचा भाऊ अन्सार हसन भिस्ती (वय-२२) हा हजर होता. घराची झडती घेतली असता एमडी ड्रग्ज न सापडता प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

गुटख्याच्या या साठ्यासह रोख ३२ हजार २७० रुपये, प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ७४ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रात्री १० वाजता पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान भिस्ती व अन्सार भिस्ती या दोघांविरुद्ध सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत.

Protected Content