अमळनेर छत्रपती नाट्यगृहाचे उद्घाटन न करता कार्यक्रमास दिल्यामुळे तक्रार

अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर नगरपरिषद हद्दीतील छत्रपती नाटयगृह उद्घाटन कार्यक्रम न घेता अनियमिततेने हस्तांतरण केल्या संदर्भात नगर पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.

यासंदर्भात अमळनेर शिवसैनिक अनंत निकम यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनात, “छत्रपती शिवाजी नाटयगृह याचे उद्घाटन समारंभ न करता कुठलाही करारनामा न करता नाटयगृह संबंधीत व्यक्तीस आपण चालविण्यास दिले ही बाब नगरपरिषद नियम मोडत अनियमितेने केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे म्हणत छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत मानले जाते. त्यांच्या नावारुपाला शोभणारे असे टुमदार नाटयगृह आपण बांधले पण कुठलीही उद्घाटनाची कोणशिला न लावता, नाटयगृह हस्तांतरण करणे, एखादया व्यक्तीस भाडे तत्वावर चालविण्यास देणे हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक प्रकारे अवमान केल्यासारखे आहे. जर हया गोष्टी अनाधानाने झाल्या असतील तर कृपया यात सुधारणा करावी. तसेच हया घटनेमुळे तमाम शिवभक्तं संताप व्यक्त करत असून जाणूनबुजून अशा प्रकारचा अपमान जर केला गेला असेल तर येणाऱ्या काळात समस्त शिवभक्तांकडून या विरोधात आंदोलन केले जाईल. यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास नगरपरिषद, अमळनेर जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलेला आहे.

दिलेल्या तक्रारीचे गांभीर्यपूर्वक विचार करत हस्तांतरण ही प्रक्रिया रद्द करावी व अगोदर रछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा घ्यावा, तसेच कोनशिला लावण्यात यावी. त्यानंतर कोणास नाटयगृह भाडे तत्वावर हस्तांतरण करावयाचे असले त्यांचा रितसर करारनामा करुन घेणे हे अगत्याचे राहील. अशा आशयाचे निवेदन शिवसैनिक अनंत निकम यांनी नगरपालिकेला दिले आहे.

Protected Content