हिंदूंच्या नृशंस हत्येच्या निषेधार्थ पारोळ्यात बजरंग दलातर्फे आंदोलन (व्हिडिओ)

पारोळा विकास चौधरी  । काश्मिर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध करत जिहादींचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा, अश्या मागणीसंदर्भात पारोळा येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास बजरंग दलाकडून आंदोलन करुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

देशभरात काश्मीर घाटीत गेल्या ५ दिवसात सात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आज केंद्र सरकारकडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की जिहादी आतंकवादाचा पूर्णतया विनाश करण्याकरिता पाकिस्तानला न भूतो न भविष्यती असे उत्तर द्यावे. तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित  करावी. हिंदूंच्या काश्मीर घाटीतील पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे.

हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणाऱ्या नृशंस हत्यांमुळे आहत झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दिनांक ९ आँक्टोबर २०२१ रोजी देशभरात जिहादी आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत. भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या , भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे. जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे आम्ही योग्य पद्धतीने जाणतो. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे.  आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे अशी मागणी व आवाहन आम्ही करीत आहोत. बलीदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

भारत विषारी सापांची, नागांची फणी ठेचण्याची परंपरा विसरलेला नाही. त्यांचा बदोबस्त करणे आम्हाला माहिती आहे. आता भारताच्या हातूनच इस्लामिक जिहादी आतंकवादाचा समूळ नायनाट होईल व तो होईपर्यत आम्ही शांत बसणार नाही याकरीता आम्ही कृत संकल्पीत आहोत. हे निवेदन राष्ट्रपती यांना सूचित करावे असे पारोळा बजरंग दल संघटनेकडून करण्यात आले व तहसीलदार अनिल गावंडे यांना निवेदन दिले अध्यक्ष विश्व हिंदू परिषद रवींद्र धनराळे व संयोजक बजरंग दल विशाल महाजन व विनोद खाडे नितीन बारी, रविंद्र पाटील व पारोळ्याचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!