जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा व चिन्ह कोणाचे याविषयी निवडणूक आयोगाने निकाल देताच अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे अभिषेक पाटील यांनी फिर्याद दिल्याने शरद पवार गटाच्या तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्याने बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाच्यावतीने निषेध करण्यात आला. या दरम्यान आकाशवाणी चौकात आंदोलन सुरू असताना अजित पवार यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरत घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी अजित पवार गटाचे अभिषेक पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, रिंकू चौधरी व इतरांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.