स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासीकेची वेळ वाढवून मिळावी – खा. पाटील

जळगाव प्रतिनिधी । स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासीकेची वेळ रात्री आठ वाजेच्या ऐवजी सकाळी सात ते रात्री अकरा अशी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील तालुका स्तरावर देखील आता स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र मोठ्या प्रमाणात तरुणाच्या सोयीसाठी सूरू करण्यात आलेली आहेत तसेच अनेक अभ्यासिका या विद्यार्थ्यांसाठी मोफत, जागा व साहित्य उपलब्ध करून देत आहे. तसेच  जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील युवक एम.पी.एस.सी. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जळगाव येथील अभ्यासिका केंद्रांत अभ्यास करीत आहेत. 

मात्र सद्यस्थितीत सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. मात्र बहुसंख्य विद्यार्थी हे आपला शैक्षणीक खर्च भागविण्यासाठी दिवसभर इतर ठिकाणी कामे करून त्याच प्रमाणे नोकरी करुन परीक्षार्थी असलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उशिरा सायंकाळी अभ्यासीका केंद्रात जात असतात. यामुळे अभ्यासिकेची वेळ रात्री आठ वाजेच्या ऐवजी सकाळी सात ते रात्री अकरा अशी वाढवून देण्यात यावी. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की  गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक आल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कृपया आपण तातडीने या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकांची वेळ सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत करण्यासंदर्भात आदेशित करावे अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.

 

 

 

Protected Content