गीतांजली श्रींच्या साहित्यात पीएच.डी प्राप्त करणारे प्रा. डॉ. राजेंद्र तायडे ठरले प्रथम विद्यार्थी

फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जगातल्या १३ पुस्तकांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने लंडन येथे सन्मानित करण्यात आले. यात गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या कादंबरिचा समावेश आहे. गीतांजली श्री यांच्या कथा साहित्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हिंदी विषयात पीएच. डी. करणारे नाहाटा महाविद्यालयतील प्रा. डॉ. राजेंद्र तायडे हे प्रथम मानकरी ठरले आहेत.

 

हिंदी साहित्यातील गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या पुस्तकाला लंडन येथे बुकर पुरस्कार देऊन पन्नास हजार पाउंड ची घोषणा करण्यात आली. या कांदबरीचा इंग्रजी अनुवाद डेझी रॉकवेल यांनी ‘ टोम्ब ऑफ सँड’ या नावाने केला आहे. या पुरस्काराची रक्कम दोघांना विभागून देण्यात येईल. या कादंबरीत ८० वर्षाच्या विधवा वृद्धेची कथा असून भारत-पाकिस्तानच्या १९४७ मधील फाळणी काळात तिच्या पतीचा मृत्यू होतो. त्यामुळे ती दुःखात बुडून जाते. मोठ्या प्रयत्नानंतर त्यातून ती सावरते. विभाजनानंतर मागे राहिलेल्या आठवणींचा सामना करण्यासाठी ती भारतातून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेते. प्रवासात येणाऱ्या समस्या याच बरोबर स्त्री विमर्श , वृद्ध विमर्श , किन्नर विमर्श, आदी विविध विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. त्यांच्या कथा, कादंबरीत हिंदीच्या लेखिका कृष्णा सोबती यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कथा – संसार पुढीलप्रमाणे ‘माई’ (१९९३ ) ‘हमारा शहर उस बरस ‘ (१९९८) ‘तिरोहित ‘ (२००१ ) ‘खाली जगह ‘(२००६ ) आणि ‘ रेत – समाधी'( २०१८ ) कहानी संग्रह – अनुगूँज , वैराग्य, मार्च, माँ और साकुरा, प्रतिनिधी कहानियाँ ,यहाँ हाथी रहते थे, आदी ग्रंथसंपदा आहेत .त्यांच्या समग्र लेखनात कृष्णा सोबती यांचा प्रभाव दिसतो येतो.
‘गीतांजलि श्री का कथा साहित्य : विषय वस्तु एवं शिल्प ‘ या विषयांवर फैजपूर येथील प्रा डॉ राजेंद्र तायडे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात या विषयावर पीएच .डी करणारे पहिले विद्यार्थी आहेत. त्यांना डॉ. मधु खराटे (भुसावळ), डॉ. सुनील कुलकर्णी (जळगाव), डॉ. संत राम वैश्य (उत्तराखंड ), डॉ. रेखा गाजरे (भुसावळ ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Protected Content