संघाच्या समितीतर्फे उखळवाडी व होळ गावांना टँकरने पाणीपुरवठा

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उखळवाडी व होळ या दोन गावांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ विमोचन समितीच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

आठवड्यातुन प्रत्येक गावाला २० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. परिसरातील असलेल्या विहिरीतून पाणी काढताना उपलब्ध करून ते गावापर्यंत टँकरने नेऊन सर्व गावकर्‍यांना पुरविले जाणार आहे. या दोन गावांना पाणी पुरवठ्याचे काम सुरू झाले आहे. या वेळी उखळवाडी गावाचे सरपंच सुशिलाबाई पाटील, गणेश पाटील तसेच होळ गावाचे सरपंच रमेश राजाराम पाटील, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी, जिल्हा दुष्काळ विमोचन समितीचे जिल्हा संयोजक ज्ञानेश्‍वर भामरे, तालुका संयोजक संजय तोडे, किरण वाणी, देवेंद्र अत्तरदे, पृथ्वीराज बयस यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कामामुळे गावकर्‍यांची तहान भागणार असुन पाण्याचा वापर आवश्यक तेवढा व काटकसरीने करावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content