
अमळनेर (प्रतिनिधी) विधानसभेसाठी इच्छुक असणारे पुणे येथील पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंचचे संस्थापक प्रमुख व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक प्रवीण महाजन यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
साहेबराव पाटील आणि प्रवीण महाजन यांच्यात यावेळी अनेक विषयांवर बंद द्वार चर्चा झाली. पुढील नियोजन कसे असावे? यावर साहेबराव पाटील यांनी श्री.महाजन यांच्या सोबत चर्चा केल्याचे समजते. तर दुसरीकडे आगामी विधानसभेसाठी माळी उमेदवारही तयारीत असून कोणत्या पक्षाकडून उभे राहतात, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अमळनेरचा आमदार माळी समाजच ठरवणार असून आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. तसेच लोणावळा येथील महाराष्ट्र माळी महासंघाची राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी उमेश धनराळे,रितेश जैन,कार्यालय संपर्क प्रमुख दिपक महाजन,विभाग पदाधिकारी मुकेश महाजन,संदीप महाजन,गणेश माळी,विजय माळी,संजय महाजन,विकास माळी, जयेश पाटील,राहूल पाटील,गोपाल माळी, शिवजय माळी,यांच्यासह युवक बांधव असंख्ये पदाधिकारी शाखा प्रमुख कार्येकर्ते उपस्थित होते.