भाजपच्या मूळ संस्कृतीला मेगाभरतीचा फटका बसला : चंद्रकांत पाटील

chandrakant patil

 

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने केलेली मेगाभरती ही चूकच होती. तसेच भाजपच्या मूळ संस्कृतीला मेगाभरतीचा फटका बसल्याचे देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.

 

भाजपमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मेगाभरती सुरू झाली आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मोठय़ा प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये आले. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय, रणजितसिंह मोहिते-पाटील, गणेश नाईक-संदीप नाईक, हर्षवर्धन पाटील, मधुकर आणि वैभव पिचड, पद्मसिंह पाटील-राणा जगजितसिंह आदी अनेकांचा समावेश होता. चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Protected Content