मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजय करा –  आमदार स्मिता वाघ

WhatsApp Image 2019 10 10 at 6.52.48 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाला चाळीसगाव तालुक्याने भरभरून साथ दिलेली आहे. चाळीसगाव तालुक्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पक्षाचे योगदान खूप मोठे आहे. मंगेश चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाने चाळीसगावचे उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केलेला आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार स्मिता वाघ यांनी मंगेश चव्हाण यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्या दरम्यान उपस्थितांना केले.

मंगेश चव्हाण यांचा प्रचार दौरा बुधवार ९ ऑक्टोबर रोजी टाकळी प्र चा या गावातून सुरू झाला. टाकळी प्र चा येथिल मंदिरात देवीला नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. प्रचारादरम्यान तरुण-तरुणी, लहान विद्यार्थी तसेच आबालवृद्ध यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. गावा-गावात त्यांचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक गावातील ग्रामदैवताची पूजा करून आशीर्वाद घेत ते पुढे जात होते. या प्रचार दौऱ्यात १८ गावांचा प्रचार दौरा पूर्ण करण्यात आला. यात  टाकळी प्र.चा. ओझर, पातोंडा, मुंदखेडा खु., मुंदखेडा बु.,बोरखेडा खु., डामरून, वाघळी, वडाळा-वडाळी, न्हावे, ढोमने, बोरखेडा, टेकवाडे,बहाळ रथाचे व कसबे ,खेडगाव,खेडी खु.,दस्केबर्डी. यांचा समावेश होता. बहाळ येथील रथ यात्रेत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, जि. प. सभापती पोपट भोळे, नगराध्यक्ष आशालता विश्वास चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, जेष्ठ नेते राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पं. स. सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, मार्केट सभापती रविंद्र पाटील, भाजपा प्रदेश सदस्य यु. डी. माळी, अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील, पं. स. सदस्य पियूष साळुंखे, गटनेते संजू राजपूत, नगरसेवक सोमसिंग राजपूत, बापू अहिरे, विजया पवार, चंद्रकांत तायडे, बाळासाहेब मोरे, चिरागोद्दीन शेख, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अविनाश चौधरी, नमो राठोड, प्रेमचंद खिवसरा, तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस प्रशांत पालवे व अमोल नानकर, सतीश पाटे, अलकनंदा भवर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे रमेश सोनवणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, किशोर पाटील ढोमनेकर, दिनकर राठोड,  किशोर गवळी, इमरान शेख, विवेक चौधरी, राजू पगार, अरुण पाटील, योगेश खंडेलवाल, राजू मांडे, सुबोध वाघमारे, विजय जाधव, रणजित देशमुख, पप्पू राजपूत, बंडू पगार, कैलास गावडे, भरत गोरे व सर्व आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य सरपंच उपसरपंच सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content