खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर यांच्या शुभहस्ते सीसीआय कापूस खरेदीचा शुभारंभ गुरूवारी १४ डिसेंबर रोजी करण्यात आला.
स्थानिक औदार्या इंडस्ट्रीज येथे शासनाच्या सीसीआय केंद्राच्या वतीने कापूस खरेदी चा शुभारंभ सागरदादा फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कृउबा समितचे सचिव अर्चना हिंगणकार, प्रशांत जाधव, सीसीआय केंद्र प्रमुख नितीन साखरकर, आदित्य वामन, शिवाजी पंडित, संजय घोगरे, संतोष काळने, सतिष जिरंगे, अभिजित देशमुख, गिरीश चांडक, नीरज खंडेलवाल, राजू पटेल ,नंदन धानुका, बागडीजी, कपिल पालीवाल,कैलास करांगळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी या केंद्रावर कापूस विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सागरदादा फुंडकर यांनी केला. कापसाची शासन किमान आधारभूत किंमत 7020 रू. असून या केंद्रावर शेतकऱ्यांनी आपला कापूस आणावा असे आवाहन सीसीआय च्या वतीने करण्यात आले आहे.