आ. संतोष बांगरांवर कारवाई करा; निवेदनाद्वारे मागणी

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर कठोर कारवाई करावी, याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे संसदीय समिती सदस्य अशोक सोनोने यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले आहे परंतु अद्यापही देशातील गोरगरीब, शोषित,पिडीत,सर्व मागासवर्गीय आजही आपल्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे. यामुळे गेल्या ४० वर्षांपासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचे प्रश्न घेऊन खऱ्या अर्थाने लोकशाहीला अभिप्रेत कार्य करीत आहेत . राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्ष ऐकमेकांवर भष्ट्राचाराचे आरोप करुन जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. पेट्रोल डिझेल, गॅस यांचे भाव गगनाला भिडत आहे.

महागाई उचांक गाठत असतांना या सर्व प्रश्नांवर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहजन आघाडी आवाज उठवत आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या कोटयावधी रुपये घोटाळ्यांच्या चौकशा चालू आहे. त्यामुळे राज्यातील सरकार भयभीत झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे भावना भडकविण्यासाठी मध्ये हिंगोलीचे आमदार संतोष बांगर ज्यांना कोणीही ओळखत नाही त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर १ हजार कोटी रुपये घेतले असल्याचे बिनबुडाचे आरोप केलेले आहे. त्यांचे आरोप हे तथ्यहीन, हास्यास्पद आहे. त्यांनी केलेल्या आरोपाचा बहुजन समाजाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत.

त्यांच्या या आरोपामुळे बहुजन समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे वातावरण गढूळ झालेले आहे. आमदार बांगर यांना कोणीही ओळखत नाही. त्यामुळे स्वतः च्या प्रसिद्धिसाठी स्टंटबाजी केली करुन तथ्यहीन आरोप केले आहे. संबंधित आमदारांवर योग्य ती कठोर कारवाई करावी व बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे लोकप्रतिनिधीत्व रद्द करावे संबंधित आमदारांवर योग्य कठोर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी संसदीय समिती सदस्य अशोक सोनोने, प्राध्यापक सोनेकर, महिला जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, तालुका अध्यक्ष प्रभाकर वरखेडे, माजी तालुकाध्यक्ष संघपाल जाधव, शहराध्यक्ष धम्मपाल नित नवेर  यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते…

 

Protected Content