एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या आर्थीक विवंचनेतूनच !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आर्थीक विवंचनेतून यावल आगारातील एसटी चालकाने जळगावात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ती खिश्यात आढळून आली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजी पंडीत पाटील (वय-४५) रा. बारीवाडा यावल जि.जळगाव असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शिवाजी पाटील हे यावल येथे पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते यावल आगारात चालक म्हणून नोकरीला होते. गेल्या पाच माहिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शिवाजी पाटील हे देखील सहभागी होते. आज या संपाला साडेपाच महिने झाले परंतू कोणत्याही मागण्या मान्य झाले नसल्याने संप सुरूच आहे. त्यामुळे पगार देखील बंद राहिला आहे. या संकटात शिवाजी पाटील देखील सापडले आहे. त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन किंवा दुसरा जोडधंदा नसल्याने त्यांना उपासमारीची वेळ आली आहे. गुरूवारी २४ मार्च रोजी शहरातील जुने जळगावातील बहिण लता आणि मेहूणे देवराम पितांबर बारी यांच्याकडे आले होते. दोन तीन दिवस त्यांच्याकडे राहिले. आर्थीक परिस्थिती हालाखीची असल्याचे बहिणीला बोलून दाखविले. त्यामुळे बहिणीने परिस्थिती लक्षात घेवून भावाला तांदूळ, मुलांसाठी कपडे आणि काही सोबत पैसे दिले. हा सामान घेवून ते रविवारी २७ मार्च रोजी यावल येथे घरी गेले. त्यानंतर सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी १०.३० बाहेरगावी जावून येतो असे सांगून गेले होते. दरम्यान, शिवाजी पाटील यांनी खिश्यात सुसाईट नोट लिहून ठेवत जळगावात आले, शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ १०.३० वाजेच्या सुमारास डाऊन लाईनच्या रेल्वेरूळावर धावत्‍या रेल्वेखाली आत्महत्या केली. सुसाईड नोट मध्ये, “माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही, धन्यवाद” असे म्हटले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच जळगावातील मेहुणे देवराम बारी, पत्नी हिरकणी व दोन मुले यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी मयत शिवाजी पाटील यांची पत्नीने प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content