जामनेर, प्रतिनिधी । आपला वाढदिवस जाहिरात, बॅनरबाजी वर खर्च करू नये, असे आवाहन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. यातून सर्वसामान्य जनतेला या अवघड परिस्थिती काय आवश्यक आहे हे बघून जळगाव येथील गोल्डसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकास बोरोले यांनी खरेदी करून २५ ऑक्सिजन कॉन्संट्रॅटर मशीन ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला भेट देण्यात आले.
या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन रुग्णांना ऑक्सिजन डिपॉझिट तत्वावर निशुल्क घरी गरज असल्यास मिळणार असल्याचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी यावेळी सांगितले. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, डॉ.महेंद्रसिंग चव्हाण, नगरसेवक आतिष झाल्टे, रविंद्र झाल्टे, निलेश चव्हाण, मयुर पाटील, सुभाष पवार, ईश्वर चौधरी, मनोज जंजाळ, अक्षय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.