उपनगराध्यक्षांच्या पतीवरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या उपाध्यक्षांचे पती गोविंद अग्रवाल यांच्या विरूध्द सफाई कर्मचार्‍याने अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

शेंदूर्णी येथील अरुण पंढरी सकट(वय २९ धंदा नोकरी शेंदूर्णी नगरपंचायत सफाई कामगार) यांनी पहुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – गोविंद मुरलीधर अग्रवाल (शेंदूर्णी नगरपंचायत उपनगराध्यक्षांचे पती) रा.शेंदूर्णी ता. जामनेर याच्यावर फिर्याद प्रमाणे सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२१ भा.द.वि. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(१)(आर)(एस)भा.द.वि. कलम ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे भाग पाचोरा हे करीत आहेत. दरम्यान शनिवारी शेंदूर्णी पोलीस दुरक्षेत्रावर घटनेतील फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. उप विभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी यांनी शेंदूर्णी नगरपंचायत कर्मचारी असलेले व अट्रॅसिटी घटनेतील साक्षीदारांचा व फिर्यादीचा जबाब नोंदविला. तर दुपारी ४ वाजता पाचोरा भाग उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांनी फिर्यादी,घटनेतील साक्षीदार व सरकारी पंचांसमक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला करून पोलीस तपासास वेग दिला आहे.

त्यानंतर पीडित फिर्यादी व घटनेतील साक्षीदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिवसभरातील घटनाक्रम सांगून आरोपीविरुद्ध कारवाई होण्यात दिरंगाई होत असल्याची शंका उपस्थित केली. कामांच्या ठिकाणी आरोपी किंवा त्याचे जवळील मंडळींकडून आमच्यावर दबाव येऊन सूडबुद्धीने खोटी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आरोपीला अटक होईपर्यंत आम्ही गावांतील दैनंदिन साफ सफाई करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. तर, यामुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content