मुख्यमंत्र्यांनी केले मराठा आरक्षणाचे स्वागत

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा समाजाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले.

आज उच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण वैध असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. अर्थात, हे आरक्षण १६ नव्हे तर १२ वा १३ टक्क्यांच्या आसपास असावे असेदेखील सूचित केले आहे. न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासीक मानला जात आहे. यामुळे आरक्षणाच्या वैधतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या निकालाचे स्वागत केले. ते म्हणाले की, हा निकाल ऐतिहासीक असून स्वागतार्ह आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग यातून मोकळा झाल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मोर्चांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. त्यांनी आजच्या निकालासाठी विरोधी पक्षांच्या सहकार्याचाही उल्लेख केला.

Protected Content