लग्न असो की दहावे-तेरावे…गर्दी टाळा ; अजित पवारांचे आवाहन

पुणे (वृत्तसंस्था) लग्न असो की दहावे-तेरावे, कोणताही कार्यक्रम असला तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे.

कोरोनाविषयी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. मात्र आवाहन करुनही गर्दी टळली नाही तर मात्र ते बंद करावे लागेल असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच ३१ मार्च नाही तर पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. अंत्यविधी,दहावा, तेराव्याला गर्दी करू नका. बाबांनो गर्दी टाळा २५ लोकांत लग्न कार्य करा. ग्रामीण भागात घरापुढे मांडव टाकून गर्दीत लग्न करत आहेत. असे करू नका. तमाम नागरिकांना आवाहन गर्दी करू नका, असेही पवार म्हणाले.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content