कोरोना : औरंगाबाद, धुळे जिल्ह्यात दारू बंदी !

औरंगाबाद धुळे (वृत्तसंस्था) कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी औरंगाबाद,धुळे  जिल्हाधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून तर ३१ मार्चपर्यंत दारू बंदी केली आहे. यानुसार जिल्ह्यातील देशी, विदेशी दारुची विक्री, बिअर बार आणि वाइन शॉपवर बंदी लावण्यात आलीय.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये होणारा संपर्क टाळण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. धुळे, औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकात आदेशाची अंमलबजावणी नाही करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लोकांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी उपाय-योजना केल्या आहेत. दारु विक्री होत असताना बिअर बार आणि वाइन शॉपवर प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हीच गर्दी लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि मुंबई मद्य निषेध कायदा कलम १४२ (१) अन्वये संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य विक्री, किरकोळ मद्यविक्री, बिअर बार आणि वाइन शॉप दिनांक २० मार्च २०२० पासून ३१ मार्च २०२० पर्यंत पूर्ण दिवस बंद ठेवले जाणार आहेत.

Protected Content