मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर : असा आहे कार्यक्रम !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिनांक 20 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या लोकार्पणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा शुक्रवार, दिनांक 20 जून रोजी असून या दौऱ्यात ते धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचे उद्घाटन तसेच जामनेर तालुक्यातील गोद्री येथील हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळाच्या ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दौरा पुढीलप्रमाणे असेल:

सकाळी 9.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. 9.55 वाजता ते मोटारीने धरणगावकडे रवाना होतील. 10.40 वाजता उपजिल्हा रुग्णालय, चोपडा रोड, धरणगाव येथे भूमिपूजन समारंभ होईल.

यानंतर 10.50 वाजता ते मोटारीने क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिराकडे प्रयाण करतील. 10.55 वाजता धरणगाव येथील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती मंदिरात अभिवादन करून 11.00 वाजता स्मारकाचे उद्घाटन आणि पाहणी.

11.10 वाजता मोटारीने डॉ. हेडगेवार नगर येथील मुख्य कार्यक्रमस्थळी प्रयाण होईल. सकाळी 11.15 वाजता डॉ. हेडगेवार नगर येथील कला विज्ञान महाविद्यालय मैदानात आयोजित मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. या कार्यक्रमात हिंदू गोर बंजारा व लबाना कुंभ प्रेरणा स्थळ, गोद्री (ता. जामनेर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन होईल.

दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 1.15 वाजता विमानतळावर आगमन होऊन दुपारी 1.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रस्थान करतील.