शहर वाहतूक शाखेची बुलेट गाडीचे सायलेन्सर, प्रेशर हॉर्न काढून १३ वाहनांवर धडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरात बुलेट वाहनाचे सायलेन्सर बदलून मोठ्या व कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या १३ बुलेट वाहनांवर आज ४ मार्च रोजी शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई केली असून बेशिस्त वाहनधारकांकडून 18 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील काही बुलेट चालक वाहनाचे सायलेन्सर बदलवून कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून जळगाव शहरातील टॉवर चौक, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक मार्गावर बेफान व सुसाट वेगाने जावून कर्कश आवाजाचे हॉर्न वाजवितात. या रस्त्यावर मोठे हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, सार्वजनिक बॅक व महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. बुलेट वाहनाच्या कर्कश वाहनाच्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषद होत असल्याने याबाबत नागरीकांच्या तक्रारी होत्या. आज ४ मार्च रोजी शहर वाहतूक शाखेने शहरातील मुख्य रस्त्यावर धडक कारवाई करत १३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत वाहने जप्त केली आहे. अशा वाहनधारकांकडून प्रत्येकी दीड हजार रूपये असा एकुण १८ हजार रूपयांचा दंड केला आहे. 

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Protected Content