Home क्राईम भरधाव डंपर पलटी : सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

भरधाव डंपर पलटी : सुदैवाने कुणालाही दुखापत नाही


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने राख घेवून जाणारे डंपर अचानक पलटी झाल्याची घटना आज घडली आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही.

 

याबाबत अधिक माहिती अशी , भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथून राख भरून निघालेला डंपर गावापासून हाकेच्या अंतरावरून जात असतांना बुधवारी १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अचानक चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने बाजूच्या लहान चारीत गेल्याने पटली झाला. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. चालक देखील सुरक्षित आहे. दरम्यान या परिसरात राखेची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने वेल्हाळेकर ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासन व ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. तसेच या राखेमुळे श्वासेच्छवास घेण्यास त्रास होत आहे.


Protected Content

Play sound