जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ भागातील रहिवासी असलेल्या एकाला अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ एप्रिल रोजी जळगाव शहरातून अटक केली होती. याप्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत चोरट्यासह त्याच्या दोन साथीदारांना आज जळगाव शहर पोलीसांनी तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.
सैय्यद रोशन सैय्यद कादीर (३५) आणि सैय्यद आझाद उर्फ बब्बू सैय्यद कादीर (४३) दोघे रा.नांदुरा-बुलढाणा अशी अटक केलेल्या दोन साथीदार चोरट्यांची नावे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनीपेठ येथे राहणारा रोहित पंडीत निंदाने याने जळगाव शहरातून चोरलेल्या ९ दुचाकी देखील काढून दिल्या होत्या. तिघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांच्याकडून चोरीच्या एकुण १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या मुद्देमालात जळगाव जिल्ह्यातील नऊ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन दुचाकी आहेत. एकुण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला होता. दरम्यान तिघांना पोलीस कोठडीनंतर हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील रामानंद नगर पोलीस स्टेशन, शनीपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, नशिराबाद आणि भुसावळ पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्याच्या चौकशी कामी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख, रतन गिते, भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर यांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.