किराणा दुकानातून गुटखा जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील न्हावी येथील एका किराणा दुकानातून पोलिसांनी धडक कारवाई करत गुटखा जप्त केला आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना यावल तालुक्यातील न्हावी गावातील राहणारा संशयीत आरोपी विक्की अशोक माखिजा ( वय ३९ वर्ष ) याने सुनिल नांवाच्या किराणा दुकानात विक्रीसाठी विमल गुटका  आणल्याची माहिती मिळाली होती.

 

या अनुषंगाने दिनांक २८ मे शनिवार रात्री३वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पा साहेब सतिश कुलकणी ,फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करीत सुनिल किराणा दुकान ,न्हावी तालुका यावल या ठीकाणाहुन सुमारे ७ लाख ३९ हजार२० रूपयांच्या  विमल गुटका जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक राहुल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानचालक विक्की अशोक माखिजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या गुन्ह्याचा तपास पुढील पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख हे करीत आहे .

 

दरम्यान यावल तालुक्यात सर्वत्र गुजरात व मध्यप्रदेश या सिमालगत असलेल्या दोघ राज्यातुन छुप्या मार्गाने विमल गुटक्याची आयात करण्यात येत असून यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Protected Content