भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील ताज नगरातील नागरी समस्यांबाबत यापुर्वी निवेदन व तक्रारी देवून सुध्दा कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरीकांनी बुधवारी २४ जुलै रोजी नशिराबाद नगरपंचायत प्रशासनाला नशिराबाद नागरीक कृती समितीच्या वतीने ताज नगरातील नागरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद गावातील विस्तारीत असलेले ताज नगरात गटारी, गटारीचे ढापे, रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटचे रस्ते, स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, आरोग्याबाबत समस्यांचे निवेदन देण्यात आले. व त्या वरील ढापे, रस्ते डांबरी व सिमेंटचे रस्ते, साफसफाई, आरोग्य,पाणीपुरवठा, बाबत मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांना नागरिक तर्फे देण्यात आले.
प्रशासनाने या मागण्यांची पुर्तता तातडीने करण्यात यावी, अन्यथा आगामी काळात आमरण अपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी निवेदन देताना रहिवाशी फकिरा शेख, युसुफ शाह, सलमान शेख, मोहम्मद भाई, सलीम शाह, अजीज भाई, सलीम सुतार, रमजान भाई, याकूब मण्यार, अल्ताफ मण्यार, अख्तर सय्यद, असिफ अली, मोहम्मद खान, अय्युब खान, युसुफ मण्यार यांच्यासह स्थानिक नगरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.