अवाजवी डोनेशन घेऊन नर्सरी ते दुसरीपर्यंतचे सुरूं असलेले ऑनलाईन शिक्षण बंद करा : युवासेना

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील १५ जूनपासून ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरू झाल्या आहेत. यात शासनाने केवळ तिसऱ्या वर्गापुढील ऑनलाईन वर्ग सुरु करण्याच्या सूचना देऊन देखील जिल्ह्यातील काही शाळांनी नर्सरी, ज्यू केजी, सिनि केजी, पहिली, दुसरीचे वर्ग सुरु केले असून ते सुरु करून नयेत अशी मागणी युवासेनेतर्फे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

युवासेने दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, कोरोना महामारीमुळे प्रत्यक्षात मात्र शाळा केव्हा सुरू होणार आहे हे सांगणे कठीण आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार इयत्ता तिसरीच्या आतील वर्ग (नर्सरी, ज्यू केजी, सिनि केजी, पहिली, दुसरी) ऑनलाईन सुरू करायचे नसून हे लहान वर्गांना ऑनलाईन शिक्षण शक्य नाही. तरी देखील जळगाव जिल्ह्यातील शाळांनी ऑनलाईन माध्यमातून हे सर्व वर्ग सुरू केले आहे. व या माध्यमातून फी सवलत न देता संपूर्ण फी भरण्याचे पालकांना सांगण्यात येत आहे. शाळांनी नवीन प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करून अवाजवी डोनेशन मागणी सुरू आहे. या कोरोना परिस्थितीमध्ये व्यवहार व्यवसाय नोकरी उद्योग ठप्प झाले आहेत. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ईमेल द्वारे तक्रार युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. आज युवासेनेतर्फे जळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी बी एस. अकलाडे यांना निवेदन देऊन अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, क्षेत्र प्रमुख मिलिंद शेटे, समन्वयक मिलिंद महाजन, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, रोहित मोरे, गिरीष सपकाळे, शुभम प्रजापत उपस्थित होते.

Protected Content