नियमित गाड्यांऐवजी नव्या विशेष रेल्वे

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी –  मध्य रेल्वे मार्गावर जळगाव मनमाड दरम्यान  प्रवाशांची मागणी असूनही नियमित गाड्यांपैकी देवळाली ऐवजी इगतपुरी- भुसावळ आणि आता मनमाड-कुर्ला(गोदावरी) विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्यांना बोग्यांची संख्या कमी असून प्रवासी भाढेवाढ देखील करण्यात आली आहे.  याऐवजी नियमित रेल्वे गाड्या पूर्ववत वेळेत सर्वसाधारण सेवेने सुरु करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.

संसर्ग प्रतिबंधात्मक नियम शिथिल शिथिल होऊनही राज्य सरकार मध्य रेल्वे मुंबई बोर्ड, नियमित रेल्वे प्रवासी गाड्या या मार्गावर वेळोवेळी मागणी करूनही सुरु करण्यात आलेल्या नाही. एकीकडे संसर्ग प्रतिबंधात्मक नियमाचा बागुलबोवा दाखवत नियमित रेल्वे गाड्यामध्ये सर्वसाधारण तिकीट सेवा आणि मासिक, त्रैमासिक पास बंद आहे, त्यांच्या नियमित वेळेऐवजी मधल्या वेळेत सायंकाळी ६ वाजेदरम्यान या रेल्वे सुरु आहेत.

दुसरीकडे गेल्या साडेपाच महिन्यापासून एसटी संप सुरु असून सर्वसामान्य प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर इगतपुरी भुसावळ आणि मनमाड कुर्ला या गाड्या सुरु केल्या असल्या तरी जळगाव मनमाड दरम्यान मात्र एकही प्रवासी गाडी त्यांच्या पूर्ववत वेळेत सुरु करण्यात आलेली नाही. या गाड्यांची बोगीसंख्या कमी असून तिकीट दर देखील बरेच आहेत. त्यामुळे आतातरी प्रशासन, लोकप्रतिनिधीं, प्रवासी संघटनानी या सर्व गाड्यांसह मासिक पासेस आणि सर्वसाधारण प्रवासी तिकीटसेवा सुरु करावी अशी मागणी केली जात आहे

केंद्र  आणि राज्याच्या डावपेचात सर्वसामान्य झाले बेरोजगार
राज्यात ‘विशेष’ नावाखाली गैरसोयीच्या वेळेत नवनवीन गाड्या सुरु केल्या जात असून केंद्र सरकारच नव्हे तर मुबई रेल्वे बोर्डाने २१ ऑक्टोबर आणि फेब्रुवारी च्या निर्णयानुसार मासिक पास, सर्वसाधारण तिकिटे सुरु करण्याचे निर्देश असूनही केवळ केंद्र सरकारच्या नावाखाली राज्य सरकार या प्रवासी सेवा सुरु करत नसल्याचे सर्वसामान्य प्रवासी वर्गात चर्चा आहे. रेल्वे किंवा एसटी बसेस शाळा महाविद्यालयीन तसेच सरकारी किंवा खाजगी कार्यालयांची वेळेनंतर जळगाव येथून पाचोरा चाळीसगाव किंवा नांदगाव आदी ठिकाणासह ग्रामीण भागात जाण्यासाठी कोणतीही पर्यायी वाहन सेवा नसल्याने अनेक खाजगी आस्थापनांच्या नोकरदार कर्मचारी कामगार वर्ग वेळेअभावी बेरोजगारीच्या विळख्यात ढकलेले आहेत.

Protected Content