यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील युवा सामाजीक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे परिवारातर्फे आयोजित ‘मोफत ई -श्रम कार्ड’ नोंदणी अभियानाच्या पाचव्या सत्रात तालुक्यातील ‘वड्री’ गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावल तालुक्यातील वड्री येथे रविवार, दि.०६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील विविध क्षेत्रातील ग्रामीण परिसरातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या म्हत्वकांशी विविध योजनांचा लाभ मिळावा याकरीता भविष्यात आवश्यक असलेल्या ‘ई-श्रम कार्ड’ची मोफत नोंदणी अभियान पाचव्या सत्रात पोहोचले आहे. वड्री ग्रामपंचायतजवळ या मोफत ई -श्रम कार्ड नोंदणीचे सत्र घेण्यात आले.
या अभियानात गावातील एकूण ३४५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. अभियानाचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे, अतुल भालेराव, सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी, भूषण फेगडे, फकिरा तडवी, नबाब तडवी, हाजी शिवरु वजीर, हमीद तडवी, संदिप लोहार, असलम तडवी, संजय पाटील, सतार तडवी, कादिर तडवी, गफार तडवी, संजू चौधरी, राजू तडवी, लतेश चौधरी, दर्शन चौधरी, रवींद्र बागुल, सागर चौधरी, शाहरुख तडवी, बाळकृष्ण सुरवाडे, लुकमान तडवी आदींची उपस्थिती होती.
या मोफत ई – श्रम कार्डनांव नोंदणी अभियानास यशस्वी करण्यासाठी डॉ कुंदन फेगडे मित्र परिवाराचे धिरज भोळे, संपर्क प्रमुख सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, दिपक फेगडे हर्षवर्धन मोरे, जयवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे सहकार्य लाभले.