तहसीलदारांच्या बैठकीकडे चोसाका पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

chosaka

चोपडा, प्रतिनिधी |  काल बुधवार ३० ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांनी मोबाईलवर चोसाकाचे चेअरमन यांच्याशी सम्पर्क साधून आज दि. ३१ऑक्टोबर रोजी चेअरमन व शेतकरी कृती समिती सदस्य यांच्या सोबत सकाळी ११ वाजता बैठक बोलावली होती.  मात्र मला वेळ ऐकू आली नाही अशी सबब देऊन चेअरमन यांनी बैठकीला दांडी मारल्याने शेतकरी कृती समितीचे सदस्य नाराज झाले असून उद्या १ तारखेला चेअमन यांनी उपस्थित राहावे अशी जाहीर विनंती त्यांनी केली आहे.

चोसका चेअरमन यांना पुन्हा एक संधी म्हणून तहसीलदार यांनी उद्या १ तारखेला दुपारी ३ वाजता या संयुक्त बैठकीला सर्व चोसाका संचालकांनी उपस्थित राहण्याचे लेखी आदेश काढलेत.चोसाका सुरु रहावा यासाठी शेतकरी कृती समिती व सर्व शेतकरी, कामगार यांनी गेल्या चार वर्षात वेळोवेळी आपल्या पैश्यांवर पाणी सोडले व माघार घेतली. परंतु, तो शेतकऱ्यांचा चांगुलपणा हा संचालक मंडळाला कृती समितीची कमजोरी वाटत असल्याने ते शेतकऱ्यांना हसण्यावारी नेत आहेत. अजूनही आम्ही चोसाका संचालक मंडळास हात जोडून विनंती करतो की उद्या शेतकऱ्यांचे पैसे देण्यासंदर्भात योग्य तो निर्णय न घेतल्यास व दोनही सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावांच्या प्रती न दिल्यास शेतकरी कृती समिती आपली चांगुलपणाची भूमिका बदलून,आम्हाला जाणीवपूर्वक फसवणूक करणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी योग्य तो निर्णय उद्या सायंकाळी तहसील कार्यालयावरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील, कृपया अजूनही वेळ गेलेली नाही. पण भात्यातील बाण सुटल्यास कुणीही आम्हाला चुकले म्हणून सांगू नये ही जाहीर विनंती एस. बी. नाना व सारे शेतकरी कृती समिती सदस्य यांनी केली आहे.

Protected Content