चोपडा कृउबा विकासाच्या वाटेवर: ३१ लाखांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हिताची कामे करत असून, याच विकासकामांचा भाग म्हणून समितीच्या आवारातील ३१ लाख रुपयांच्या ट्रिमिक्स काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. या कामामुळे शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांना मोठा फायदा होणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत सोनवणे हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार लता सोनवणे, रोहित निकम आणि घनश्याम अग्रवाल उपस्थित होते. बाजार समितीच्या आवारात झालेल्या या काँक्रिटीकरणामुळे धूळ कमी होईल, पावसाळ्यात चिखल होणार नाही आणि मालाची वाहतूक व आवक-जावक सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बाजार समितीने गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांच्या सोयीसाठी विविध विकासकामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे बाजार समितीचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली असून, सर्व घटकांना या विकासकामांचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.