Home Cities जळगाव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात खाजगी भुकरमापक पदासाठी अर्जांचे आवाहन

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात खाजगी भुकरमापक पदासाठी अर्जांचे आवाहन

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, जळगाव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, जळगाव यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये मोजणी कामासाठी खाजगी संस्थेमार्फत खाजगी भुकरमापक (Private Land Surveyor) नियुक्त करण्यात येणार असून, या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका अथवा आयटीआय अंतर्गत सर्व्हेअर (Surveyor) कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी व तांत्रिक कामकाजासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधून सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक काशिनाथ मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या या उपक्रमामुळे मोजणी कामकाज अधिक वेगवान व तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.


Protected Content

Play sound