चोपडा प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या सभापती मालुबाई गोविंदा कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
येथील पंचायत समितीच्या सभापती राष्ट्रवादीच्या मालुबाई गोविंदा कोळी यांनी आधी ठरल्यानुसार आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी पं.स.सदस्य आत्माराम म्हाळके, यशवंतराव पाटील, गोविंदा कोळी, बापुराव पाटील हे उपस्थित होते.
पंचायत समितीत १२ सदस्यांपैकी भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, शिवसेनेचे २ असे पक्षीय बलाबल आहे. येथे प्रारंभी शिवसेना- भाजपची युती होती. परंतू नंतर राष्ट्रवादी व भाजप यांची युती झाली होती. कल्पना यशवंतराव पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या मालुबाई कोळी सभापती झाल्या होत्या. ठरल्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. यानंतर आता या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे. भाजपच्या प्रतिभा बापूराव पाटील यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.