सत्तेत आल्यावर राफेल व्यवहाराची चौकशी करणार : काँग्रेस

rahul gandhi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी राफेल डीलची चौकशी केली जाईल. तसेच हा मुद्दा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात घेतला असल्याची माहिती, काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी थोड्याच वेळात नवी दिल्लीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यामध्ये अनेक लोकानुनयी घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातले मतदान सुरू होईल. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकी काय काय आश्वासने देण्यात आली आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा समावेश असेल. कारण काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत या योजनेची घोषणा केली होती. याशिवाय 22 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचा समावेशदेखील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असू शकतो.

Add Comment

Protected Content