चोपडा माळी समाज देतोय समाजाभिमुख आदर्श

 

चोपडा, लतीश जैन | संघटित राहिले तर काय फायदा होतो हे आपण नेहमी अनुभवलं आहे. घरात संघटित राहता येऊ शकते. परंतु, समाजात संघटित राहणे अवघड झाले आहे. आणि जो समाज संघटित त्याचा प्रभाव राजकारण, समाजकारण, इतरत्र सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु, येथील माळी समाज फक्त संघटितच नसून हा समाज देतोय समाजभिमुख आदर्श ……! हा आदर्श कौतुकास्पद असून इतरांनाही अनुकरण करायला हवे असा हा आदर्श….

नुकतीच श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहात ,विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, महाप्रसाद, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम घेतले गेले. या पाच दिवसात माळी समाजाने अनेक उपक्रम राबविले. पुण्यतिथीनिमित्त समाजाच्या पंच मंडळाने सर्व समाजातून देणगी गोळा करून पुण्यतिथी साजरी केली. यात चोपडा शहरात ६०० कुटुंब आहेत प्रत्येक कुटुंबातुन ठराविक रक्कम घेण्यात आली. तसेच समाजात विधवा महिला असेल आणि तिच्या घरात कर्ता कोणी नसेल तर त्या कुटूंबाकडून कोणतीही वर्गणी घेण्यात आली नाही. सामाजिक कार्यक्रमला कोणीही कोणाला बोलवाले जात नाही तर त्या त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते की आपल्या घराचा व्यक्ती तिथे न सांगता कामाला यायला हवा. सामजिक कार्यात कोणीही मद्यप्राषाण करून आल्यास त्या व्यक्तीस समाजाच्या बैठकीत माफी मागून समाजाचा निर्णयानुसार दंड ही भरावा लागतो. सामाजिक मिरवणूकित कोणत्याही व्यक्तीने वाद घातला तर त्यालाही समाजापुढे माफी आणि दंड देणे आवश्यक आहे असे अनेक नियम आहेत.या व्यतिरिक्त नुकत्याच पुण्यतिथीनिमित्त ७ ते ८ हजार लोकांचा भंडारा करण्यात आला. या भंडाऱ्यानंतर तयार व शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थाचा लिलाव श्री फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळचे अध्यक्ष नारायण महाजन, उपाध्यक्ष पुंडलिक महाजन, खजिनदार दगडू माळी, सचिव सी. बी. माळी, यांच्यासह संपुर्ण पंच मंडळच्या व समाजातील सर्व समाज बांधवांच्या उपस्थित मोठामाळी वाड्याचा मंगल कार्यालयात मीटिंग घेऊन हा लिलाव करण्यात आला. त्यात तेल, साखर, डाळ, तांदूळ, गहू, मीठ, सुटा मसाला, तूप, व इतरत्र अनेक वस्तूचा लिलाव करण्यात आला. या लिलावात फक्त समाजातील घटकच बोली लावू शकता या सर्व लिलावातुन माळी समाजला किरकोळ रक्कम मिळाली असून ते पुढील सामाजिक कार्य करण्यासाठी कामात घेण्यात येईल अशी माहिती सचिव सी.बी. माळी यांनी दिली. ते म्हणाले की मागील ४२ वर्षांपासून ही परंपरा आमच्या समाजात सुरू आहे. यासाठी समाजातील लहानांपासून तर वरिष्ठांपर्यंत सर्वच जण साथ देतात त्यामुळेच इतके मोठे कार्य पंच मंडळ करू शकते. किरकोळ साहित्यातून काही ठराविक देणगी मिळून गेली आणि समाजात एकही भानगड न होता सर्व समाज बांधव एकत्र येऊन अश्या अनेक पध्दती अवलंबतात हा आदर्श समाजाभिमुख आहे आणि असे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे भंडाऱ्याचे मीठ जरी उरले असेल तर तेही लिलाव पध्दतीने दिले जाते. एकही वस्तू वाया जात नाही आणि समाजाला पैसे ही मिळतात आणि अश्या लिलाव पध्दतीमुळे ही वस्तू हा घेऊन गेला की, तो घेऊन गेला असा हेवा दावा होत नाही. कधीतरी एखादी वस्तू दोन लोकांना लागणार असते तेव्हा बोली जास्त भावात जाते त्याचाही फायदा समाजाला होतो. अध्यक्ष अध्यक्ष नारायण महाजन म्हणाले की, समाजा पुढे पंच मंडळ छोटे आहे. समाज एकजुटीने साथ देत असतो म्हणून ४२ वर्षापासून अविरतपणे हे नियम व अटी सुरळीत सुरू आहे. यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाला धन्यवाद दयावे तितके कमी असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Protected Content