व्यापाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न (व्हिडीओ)

chopda news

चोपडा प्रतिनिधी । शेळ्या मेंढ्यांचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना चहार्डी-वेले रस्त्यावर साखर कारखान्याच्या गेटजवळ अज्ञात चार दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार ते पाच लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापारी आणि दरोडेखोर यांच्यात झटापटी झाल्याने व शेजारील शेतातील शेतकरी घटनास्थळी धाव घेऊन आल्याने व्यापाऱ्यांच्या ताब्यातील रोकड वाचली आहे. तरीही दहा ते पंधरा हजार रुपये लुटून दरोडेखोर पसार झाले आहेत.

प्राप्त सविस्तर माहिती अशी की, शेळय़ा मेंढय़ांचा व्यापार करणारे व्यापारी दिलीप काशीनाथ धनगर रा.चहार्डी आणि कलीम सलील खाटिक रा. हातेड बु हैदराबाद येथे शेळ्यामेंढय़ा विकून परत चहार्डी येथे त्यांच्याकडे असलेली महिंद्राच्या पिकअप गाडी (MH18 BG 0668) ने परत येत असताना पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास कारखान्याच्या गेट शेजारी रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड पाटाच्या चारी शेजारी आडवे करून वाहन अडवले. चार दरोडेखोर असल्याने त्यांच्याकडे गावठी पिस्तूल होता. त्याचा धाक व्यापाऱ्यांना दाखवला. आणि व्यापाऱ्यांच्या ताब्यात असलेली अंदाजे चार ते पाच लाख रूपये लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र घटना स्थळापासून वेल्याकडे पिकअप गाडीचा चालक संतोष जाधव याने काही अंतरापर्यंत पळत जाऊन तेथील शेतात शेतकरी गायीचे दूध काढत असताना शेतकरी विनोद पाटील आणि लीलाधर पाटील यांना सदर घटना सांगितली. शेतकरी व चालक परत घटना आल्याने व तोपर्यंत व्यापारी आणि दरोडेखोर यांच्यात झटापटी सुरूच होती. त्यात दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत आसऱ्यांनी व्यापार्‍यांना व त्यांच्यासोबत अजून एक जण असलेला छोटू बापू धनगर यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघेही व्यापारी यांना मुक्कामार लागला असून ते चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घटनास्थळी पोलीसांची धाव
घटनेचे वृत्त समजताच चोपडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, फौजदार यादव भदाने आणि पोलिस कुमकने धाव घेतली. व पिकअप गाडीचे चालक आणि अजून एक जण यांच्या कडून घटनेची माहिती जाणून घेतली. चोसाका गेटच्या मागच्या बाजूला फेकलेला गावठी कट्टा पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

परीसरातील नागरीकांमध्ये भीती
पिकअप गाडीतील दोन व्यापारी व इतर चालकासह दोन जण यांच्यात आणि चार अज्ञात दरोडेखोर यांच्यात झटापटी झाल्याने त्यातील एका दरोडेखोराला डोक्याला मोठी जखम झाल्याचे घटनांसाठी बोलले जात होते. मात्र सदर गावठी कट्टा फेकून चारही दरोडेखोर साखर कारखान्याच्या रस्त्याकडून निमगव्हाण किंवा चहार्डीकडे पसार झाल्याचे समजले आहे. चारही दरोडेखोरांनी बोलपटाने मरण तोंडाला रुमाल बांधला असून चोसाकाच्या वसाहतीकडून गेले असल्याचे वसाहतीवरील रहिवाशांनी सांगितले. घटनास्थळी पिकअप गाडीचा चालक संतोष जाधव (२८) (रा. अजनाड बंगला) तालुका शिरपूर आणि छोटू बापू धनगर (रा. चहार्डी) यांची पोलिसांनी घटनास्थळी कसून चौकशी केली. दोघांकडील मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत तसेच व्यापारी दिलीप काशीनाथ धनगर (वय ५०) याचा जबाब पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक विनायक लोकरे करीत आहेत.

Add Comment

Protected Content