योजनांमधील वाढीव रकमेचा लाभ केव्हा मिळणार ?

चोपडा प्रतिनिधी । राज्य शासनाने विविध योजनांमधील मिळणार्‍या लाभाच्या रकमेत वाढ केल्याची घोषणा केली असली तरी ही वाढीव रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम त्वरीत देण्यात यावी अथवा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लालबावटा संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र शासनाकडून ६५ वर्षे वरिल शेतमजूर, अल्प भूधारक ,शेतकरी ,महिला व पूरूष तसेच संपूर्ण निराधार दिव्यांग आणि २१वर्षेपेक्षा कमी वयाची मुले असलेल्या विधवा महिलांना श्रावण बाळ इंदिरागाधी संजय गांधी योजना वृद्धापकाळ पेंशन योजना अंतर्गत दरमहा ६००रू मानधन मिळत आहे. निवडणुकीआधी यातील विविध योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तथापि, राज्य शासनाच्या घोषणेनुसार वाढीव रक्कम आलीच नाही. शासनाने आपल्या घोषणेची त्वरीत अंमलबजावणी त्वरित करावी अन्यथा शेतमजूरांचे या प्रश्‍नावर आंदोलन करण्याचा इशारा लालबावटा शेतमजूर यूनियनतर्फे कॉ अमृत महाजन, जिल्हा सचिव गोरख वानखेडे, नामदेव कोळी, अरमान तडवी, जिजाबाई राजपूत, ठगूबाई कुंभार, कैलास महाजन, नानाभाऊ पाटील, वासुदेव कोळी, संतोष कुंभार आदींनी दिला आहे.

Protected Content