चोपडा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

33 1

चोपडा, प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस’ व जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व कविवर्य कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) तसेच कै.ना.आक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी ‘कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवसानिमित्त‘ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित तसेच मराठी भाषेची उत्पत्ती, भाषेचे संवर्धन व उपाययोजना, कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य डॉ. व्ही. टी. पाटील, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य बी. एस. हळपे, पर्यवेक्षक व्ही. वाय. पाटील, श्रीमती एम.टी.शिंदे, डॉ. एस. ए. वाघ, एस. बी. पाटील, डॉ. आर. आर. पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के. एन .सोनवणे यांनी केले. यावेळी बी. ए. व एम.ए. मराठीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आमची मराठी आणि आमचे वाचन’ या हस्तलिखीताचे तसेच एस.वाय.बीएस्सी. च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘नाट्य दर्पण’ या संकलित नाटकांच्या संग्रहाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कविता बोरसे, कोळी सपना, राहुल निकुंभ, प्रवीण कहाणे, प्रमोद पाटील, भिल शुभम या विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच राहुल पाटील या विद्यार्थ्याने नटसम्राट नाटकातील स्वगताचे सादरीकरण केले तर हर्षल शिंपी या विद्यार्थ्याने मराठी भाषा संवर्धनाविषयी आपले मत मांडले. यावेळी मराठी विभागातर्फे घेण्यात आलेल्या पावसाळी कविता गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त सपकाळे विशाल गोपीचंद, द्वितीय- कहाणे प्रवीण मधुकर, तृतीय- पाटील प्रमोद वसंत व निकुंभ राहुल गोविंदा या विद्यार्थ्यांना तर शब्द संपदा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त चौधरी जागृती सुहास, द्वितीय – साळुंखे निकीता हिरालाल, तृतीय – विसावे वर्ष अशोक आणि उत्तेजनार्थ- बोरसे अर्चना सुरेश या विद्यार्थ्यांना तसेच महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा ११ वी वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त पाटील मोहिनी कैलास, द्वितीय- चौधरी रश्मी जितेंद्र, तृतीय- बाविस्कर प्राजक्ता लकीचंद आणि बागुले आरती दिलीप या विद्यार्थ्यांना तसेच महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा १२ वी वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त पाटील हर्षदा गुलाब , द्वितीय- नांद्रे अश्विनी ब्रीदलाल आणि तृतीय- कोळी कुलेश्वरी अनिल या विद्यार्थ्यांना तसेच महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा एफ.वाय.बी.ए. वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त सैंदाणे हर्षाली शांताराम, द्वितीय- गुजर पंकज मुकुंदा आणि तृतीय- पाटील अश्विनी राजेंद्र या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा एस.वाय.बी.ए. वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त बडगुजर सरला राजेंद्र, द्वितीय- पाटील किरण संजय व तृतीय- सोनवणे कामिनी सुदाम या विद्यार्थ्यांना आणि महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा टी.वाय.बी.ए. वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त धनगर जयश्री भगवान, द्वितीय- पाटील प्रियंका गोपीचंद आणि तृतीय- कोळी सपना देवराम या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी एस. बी. पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मराठी भाषा ही आता सक्तीची केली आहे. आपल्या माय मराठीच्या संवर्धनासाठी कायदा करून सक्ती करावी लागते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपल्या मातृभाषेत प्रभावी संवाद साधणे तितकेच महत्वाचे ठरते. काळजाला भिडणारे साहित्य अक्षर साहित्य असते, म्हणूनच वि.वा.शिरवाडकरांचे नटसम्राट हे नाटक अक्षर साहित्य ठरते. साहित्य हा एकांतातील उत्सव असतो. याप्रसंगी त्यांनी नटसम्राट नाटकातील संवाद व कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितांचे सादरीकरण केले.या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य एन. एस. कोल्हे यांनी सांगितले की, आपण बोलतो त्या बोलण्यात विविधता असते. यातून मराठी भाषा ही सर्वसमावेशकता धारण करते. मातृभाषेतून माणूस आत्मविश्वासने बोलतो. प्रत्येकाची भाषा ही प्रमाणच असते. भाषेचा जेवढा प्रसार व प्रचार कराल तेवढा तिचा विकास होईल. भाषा आत्मसात करण्याने भाषेला अधिक समृद्ध करता येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एल. भुसारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.व्ही.जी.सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. बी. पाटील, शाहीन पठाण, जी. बी. बडगुजर यांनी सहकार्य केले.

Protected Content