चोपड्यातील महावीर पतसंस्थेचे पदाधिकाऱ्याना सोमवारपर्यंत दिलासा

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील महावीर नागरी सह पतपेढीचे पदाधिकाऱ्यांना सहा. निबंधक यांनी अपात्रतेची (शो कॉज) नोटीस बजावली होती. त्या संदर्भात आज दि.२७ ला सुनावणी असल्याने त्या पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे हि सुनावणी आज होऊ न शकल्याने पधिकाऱ्यांना सोमवारपर्यत दिलासा मिळाला आहे.

सहा. निबंधक के.पी.पाटील यांनी महावीर नागरी सह पतपेढीचे पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेसंदर्भात आज (दि. २७) रोजी सुनावणी होती. या सुनावणीकडे संपुर्ण चोपडा शहराचे लक्ष लागून होते. मात्र चौकशी अधिकारी के.पी.पाटील यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ते गैरहजर असल्याने त्यांच्या आदेशानुसार कार्यलयाकडून पुढील सुनावणी दि २ फेब्रुवारी सोमवार रोजी ठेवण्यात आल्याचे कळविले गेले. मात्र पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सोमवार पर्यंत मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content