जी .जी. खडसे महाविद्यालयात लिंगभाव संवेदनशीलतेवर व्याख्यान

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जी .जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियानात लिंगभाव संवेदनशीलता या विषयाचे व्याख्यान  14 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी ठीक 10:00 वा. आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एच.ए.महाजन , तर प्रमुख मार्गदर्शक व्याख्याता म्हणून डॉ. मुक्ता महाजन ,तर प्रमुख उपस्थिती उप-प्राचार्य मा. डॉ. ए. पी पाटील, विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ.प्रतिभा ढाके, ऋतुमती अभियानाच्या समन्वयिका प्रा.संगीता देशमुख यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रा.प्रतिभा ढाके यांनी या अभियानाचा उद्देश सांगितला.आणि
पाहुण्यांचा परिचय डॉ. ए. पी पाटील यांनी करून दिला, डॉ. मुक्ता महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात लिंगभाव संवेदनशीलता जपणे चांगल्या समाज निर्मितीसाठी गरजेचे आहे असे प्रतिपादन केले मुलींनी सक्षम सशक्त होण्यासाठी आपला आहार शारीरिक व मानसिक दृष्टीने सुदृढ असणे तसेच विचारांची परिपक्वता असेल तर अनेक उभ्या आव्हानांना तोंड देऊ शकतोअसे सांगितले .अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महाजन यांनी लिंगभाव संवेदनशीलता जपणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण काय काय करावे यासाठी विविध दाखले देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अभियानात 63 विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मयुरी सावळे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सविता जावळे प्रा.छाया ठिंगळे, डॉ.ताहिरा मीर यांनी परीश्रम घेतले.

Protected Content