मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाले प्रत्यक्ष ऑनलाइन स्टॉक मार्केटचे धडे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालय वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावरील मेस्ट्रो स्पर्धा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स सभागृहात झाली. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या ऑनलाइन स्टॉक मार्केट सह, क्विझ कॉम्पिटीशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, बिझिनेस आयडियाचे धडे देण्यात आले.

उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. पी. व्ही. पवार होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे उपस्थित होते. सूत्रसंचालन सृष्टी दुबे यांनी केले. तर सीए ए. एन. आरसीवाला यांनी आभार मानले. ही स्पर्धा एकूण चार विभागांमध्ये झाली. यात क्विज कॉम्पिटिशन, ऑनलाइन स्टॉक मार्केट, पावर पॉइंट प्रेझेंटेशन, बिझनेस आयडिया या प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण 193 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचा निकाल
क्वीज कॉम्पिटिशनमध्ये दुर्गेश विसपुते, नयना वाघ, मीनल पाटील (मूळजी जेठा महाविद्यालय). ऑनलाइन स्टॉक मार्केट या स्पर्धेत रोहित देसले आणि जुगल परमार (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), पावर पॉइंट प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये गुंजन जैन आणि विधी शहा (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) तसेच बिझनेस आयडिया या स्पर्धेमध्ये प्रथमेश मावळकर ( मूळजी जेठा महाविद्यालय) यांनी प्रथम पारितोषिक जिंकले. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

बक्षीस वितरण जल्लोषात
बक्षीस वितरण सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सृष्टी दुबे यांनी केले. तर डॉ. विशाल देशमुख यांनी आभार मानले. वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. सुरेखा पालवे, डॉ. विवेक यावलकर, प्रा.सीए वाय. ए. सैंदाणे, सीए ए. एन .आरसीवाला आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content