चोपडा प्रतिनिधी । शासकीय नियमानुसार परवानगी न घेतलेल्या तालुक्यातील अॅक्वा युनिटवर कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून या अंतर्गत दोन युनिट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटी, अन्न व औषध प्रशासनाची एनओसी नसलेले अॅक्वा जार युनिट सील करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शहरातील १४ युनिटला मुदतीत अधिकृत प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यापैकी १२ युनिटने चोपडा पालिकेत प्रमाणपत्रे सादर केली. त्यांना उर्वरित प्रमाणपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, श्रीराम अॅक्वा व ए.जे.अॅक्वा यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. यामुळे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दोन्ही युनिट तातडीने बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.